बाला दित्य
बाला दित्य : (इ. स. पाचवे शतक). भितरी येथील मुद्रेवरून तो पूरुगुप्ताचा पुत्र आणि दुसऱ्या कुमारगुप्ताचा पिता होता, असे कळते. त्याच्या कारकीर्दीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तो इ. स. ४७०-७३ दरम्यान गादीवर असावा. त्याचे मूळ नाव नरसिंहगुप्त. त्याच्या सोन्याच्या नाण्यांवर ‘नर’ असे आढळते. त्याच नाण्यांवर त्याचे ‘बालादित्य’ असे बिरुद आले आहे.